विद्यापीठाचा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य (व्हिडिओ)

नाना वाडा (शिवाजी रस्ता) - एेतिहासिक नानावाड्याच्या नूतनीकरणानंतर त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी (डावीकडून) गिरीश बापट, फडणवीस, पुरंदरे, महापौर
नाना वाडा (शिवाजी रस्ता) - एेतिहासिक नानावाड्याच्या नूतनीकरणानंतर त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी (डावीकडून) गिरीश बापट, फडणवीस, पुरंदरे, महापौर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम हरित महाराष्ट्रासाठी स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होऊन स्वच्छ वारी, निर्मल वारी करण्यासाठी वारकऱ्यांचे प्रबोधन करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारीची’ शपथ दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ अभियान महासंकल्पामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या १६ हजार ७३० रोपांचे वाटप करण्यात आले. याची गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मुक्ता टिळक, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना यावर्षी पाच लाख रेनकोट देण्याची योजना आखली आहे.’’ डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘ आपली वारी स्वच्छ, निर्मल आणि हरित करणे हा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी वारीमध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छ वारी’चा संदेश देणार आहेत.’’

दरम्यान, बिबवेवाडी परिसरातील चैत्रबन येथे मिहीर कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या ‘ग्रॅव्हिटी फिटनेस क्‍लब’चे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. जय भवर, अमोल कचरे, रवी वाघ, प्रियांका भगत, पांडुरंग धबे, सुनील मल्लाव, सागर धुमाळ या दिव्यांगांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, ॲड. उज्ज्वल निकम, फिटनेस क्‍लबचे संचालक सुधीर कुलकर्णी, गांधाली कुलकर्णी, संजय मोरे आदी उपस्थित होते.

पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविणार - देवेंद्र फडणवीस 
‘‘पत्रकारांसाठी पेन्शन व आरोग्य सुविधा या योजना आम्ही मार्गी लावल्या आहेत. त्यांच्या घराचा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. ‘म्हाडा’च्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी लवकरच घरकुल योजना राबविली जाईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या १९४० ते २०१९ या आठ दशकांच्या प्रवासाचा इतिहास ‘स्मृतिचित्रे’ या ‘कॉफीटेबल बुक’च्या माध्यमातून मांडला आहे. त्याचे प्रकाशन रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि आधुनिक असे तिन्हीही काळ पुणे श्रमिक पत्रकार संघाने पाहिले आहेत. संघाचे कार्य गौरवास्पद आहे.’’ सूत्रसंचालन प्रशांत आहेर यांनी केले. चंद्रकांत हंचाटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com