esakal | Video: 'I Love Narhe' सेल्फी पॉइंटची तोडफोड; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Narhe_Selfie_Point

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हेगावात घडला प्रकार cctv मध्ये कैद; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल...

'आय लव्ह नऱ्हे ' विद्युरोषणाई केल्यामुळे रात्रीच्या वेळी अतिशय मनमोहक दिसत होते.

Video: 'I Love Narhe' सेल्फी पॉइंटची तोडफोड; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे पुणे-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. या गार्डनमध्ये 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने तयार करण्यात आला आहे.

नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने केलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या चार तरुणांपैकी एकाने ह्या फलकाची तोडफोड केली असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'मराठा आरक्षणाच्या सुनावणीत घोटाळा झाला तर सरकार जबाबदार : खासदार छत्रपती संभाजीराजे​

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असल्याचे समजते.  

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत समविष्ट करण्याचा अध्यादेश काल बुधवारी राज्य सरकारने काढला. त्यात नऱ्हे गावाचाही समावेश आहे. राजकीय वर्चस्वाच्या तसेच राजकीय वैमणस्यातून ही तोडफोड झाल्याचे बोलले जात असल्याची नागरिकांमध्ये कुजबुज सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)