esakal | आरक्षित भूखंडावर बेवारस वाहने
sakal

बोलून बातमी शोधा

मोशी प्राधिकरण : आरक्षित भूखंडामध्ये आढळलेल्या बेवारस दुचाकी.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी व चिखली प्राधिकरणाचा विकास केलेला आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने काही भूखंडांचे आरक्षण करून ठेवलेले आहे. मात्र, प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील एका भूखंडावर अनेक बेवारस दुचाकी वाहने आढळून आली आहेत.

आरक्षित भूखंडावर बेवारस वाहने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मोशी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोशी व चिखली प्राधिकरणाचा विकास केलेला आहे. नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्राधिकरणाने काही भूखंडांचे आरक्षण करून ठेवलेले आहे. मात्र, प्राधिकरणातील पेठ क्रमांक सहामधील एका भूखंडावर अनेक बेवारस दुचाकी वाहने आढळून आली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, ही वाहने येथे कोणी ठेवली, का ठेवली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही. प्राधिकरणाने मोशी प्राधिकरणामध्ये असलेल्या सर्व भूखंडांना प्राधिकरणाच्या वतीने सीमाभिंती बांधण्यात आल्या आहेत. या भूखंडांवर कोणी अतिक्रमण करू नये, या उद्देशाने या सीमाभिंती बांधण्यात आल्या आहेत. तरीही काही नागरिक या भूखंडांमध्ये राडारोडा टाकण्यायाबरोबर अन्य कामासाठी वापर करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्याला पायबंद बसावा म्हणून प्राधिकरणाने मोशी चिखली प्राधिकरणातील भूखंड प्राधिकरणाने आरक्षित केले होते, त्या प्रत्येक भूखंडाला लाखो रुपये खर्च करून सीमाभिंती बांधण्यात आल्या.

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

बंदिस्त न केल्याने काही नागरिकांचे फावले आहे. येथील काही नागरिकांनी स्वतःच्या बांधकामातील राडारोडा, त्याचप्रमाणे अन्य काही उद्योग सुरू केले आहेत. आता तर एका भूखंडामध्ये काही बेवारस दुचाकी आढळून आल्या आहेत. या दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या दुचाकी नेमक्‍या कोणाच्या आहेत, असा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. बेवारस पडलेल्या या वाहनांमुळे प्राधिकरणात गलिच्छपणा वाढण्याबरोबरच प्राधिकरणाच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

loading image