पुणे : कर गोळा करणारे कर्मचारीच बिनपगारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salary
पुणे : कर गोळा करणारे कर्मचारीच बिनपगारी

पुणे : कर गोळा करणारे कर्मचारीच बिनपगारी

पुणे : पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील नागरिक सहायता केंद्रातून (सीएफसी) कंत्राटी (Pune Municipal Corporation)कामगारांकडून रोज किमान दहा लाखाचा कर गोळा केला जातो. जन्म-मृत्यूचे दाखले दिले जातात. हेच कर्मचारी (employees)गेल्या सात महिन्यांपासून बिनपगारी आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत कर्मचाऱ्यांना त्वरित वेतन देण्याचे आदेश देण्यात आले, मात्र त्यानंतरही अद्याप त्यांच्या हातात पगार पडलेला नाही. पुणे महापालिकेकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात यामध्ये बहुतांश सेवा या ऑनलाईन(Online) माध्यमातून दिल्या जातात. मिळकत कर भरणे,(income Tax)जन्म मृत्यूचा दाखला देणे, अतिक्रमणाचा दंड भरणे, आकाशचिन्ह परवान्याचे शुल्क, पाणीपट्टी(Water Bill) यासह सुविधा पुरविल्या जातात. हे नागरी सुविधा केंद्र ठेकेदाराच्या माध्यमातून चालविले जात आहेत. येथील कर्मचार्यांना २३ हजार रुपये पगार असून, कपात होऊन १८ हजार रुपये हातामध्ये पगार येतो.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान फाळणीत झाली ताटातूट, तब्बल 74 वर्षांनंतर भेट!

महापालिकेकडून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. निवासी मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्यात येत असून नागरिक थकबाकी भरण्यासाठी याच केंद्रांवर जात आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार नेमून सीएफसी चालवले जात आहेत. सध्या १०० कर्मचारी याठिकाणी काम करत असून, काही जण १० वर्षापासून येथे कार्यरत आहेत. मार्च २०२० मध्ये जुन्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून हे काम त्याच्याकडून काढून घेण्यात आले. नवीन ठेकेदार निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. महापालिकेने या काळात कंत्राटी कामगारांकडून हे केंद्र सुरूच ठेवले. एका महिन्यापूर्वी महापालिकेची मुख्यसभा सुरू असताना सभागृहाबाहेर या कर्मचार्यांनी आंदोलन करून पगार देण्याची मागणी केली. सभागृहात सर्वच राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरून पगार न देता कसे काम करून घेता अशी टीका प्रशासावर केली होती. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्वरीत पगार जमा करावेत असे आदेश दिले. तरी ही प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.(pune News)

हेही वाचा: देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

दिवसभर काम आणि संध्याकाळी महापालिकेत

नोकरीची गरज असल्याने हे १०० कर्मचारी दिवसभर सीएफसीमध्ये काम करत आहेत. त्याकाळात महापालिकेत येऊन अधिकार्यांना भेटून पाठपुरावा करणे शक्य नाही. मात्र, कामाची वेळ संपताच महापालिकेत येऊन पदाधिकारी, अधिकारी यांची भेट घेऊन पाठपुरावा करत आहेत.

"सीएफसी सेंटरच्या कर्मचार्यांना पगार देण्यात येणार असूनच, या कामाची कालच वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना वेतन मिळेल. "

- प्रतिभा पाटील, उपायुक्त

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top