आनंद यादव भेटणार अप्रकाशित साहित्यातून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे : गेल्या तीन वर्षांपूर्वी साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी लेखननिवृत्ती जाहीर केली होती; पण त्याआधी लिहिलेले बरेचसे साहित्य अजूनही अप्रकाशित आहेत. त्यातले निवडक साहित्य टप्प्याटप्प्याने वाचकांसमोर आणण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. 

पुणे : गेल्या तीन वर्षांपूर्वी साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी लेखननिवृत्ती जाहीर केली होती; पण त्याआधी लिहिलेले बरेचसे साहित्य अजूनही अप्रकाशित आहेत. त्यातले निवडक साहित्य टप्प्याटप्प्याने वाचकांसमोर आणण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. 

डॉ. यादव यांच्या कन्या कीर्ती मुळीक आणि स्वाती यांच्याशी 'सकाळ'ने संवाद साधला. डॉ. यादव यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यकृतींवर वाचकांनी मनापासून प्रेम केले. त्यांच्या जाण्याने वाचकांना जितके दु:ख झाले आहे, तितकेच आम्हालाही झाले आहे; पण ते वेगवेगळ्या साहित्यकृतीतून भेटतच राहतील. अप्रकाशित साहित्यातलेही काही निवडक साहित्यही आम्ही नक्कीच वाचकांसमोर आणू, असे त्या सांगत होत्या. 

गेल्या तीन वर्षांत डॉ. यादव यांनी एक शब्दही लिहिला नाही. लेखन पूर्णपणे थांबवले होते; पण वाचन त्यांनी अजिबात सोडले नव्हते. मात्र अलीकडे ते केवळ 'झोंबी', 'नांगरणी', 'घरभिंती', 'काचवेल' हे आत्मचरित्रच वाचायचे आणि जुन्या आठवणीत रमत राहायचे... असे सांगताना स्वाती यांचे डोळे पाणावले होते. दरम्यान, डॉ. यादव यांनी काही वर्षांपूर्वी आत्मचरित्राचा अखेरचा भाग लिहिणार, असे सांगितले होते. ही घोषणा त्यांच्या निधनामुळे अपूर्णच ठरली. 

चर्चा संमेलनाध्यक्षपदाची 
साहित्य क्षेत्रातील राजकारणामुळे डॉ. आनंद यादव यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवता आले नाही, याबाबत सर्वच साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली. द. मा. मिरासदार, अनिल अवचट, नागनाथ कोत्तापल्ले, श्रीपाल सबनीस, मिलिंद जोशी, अरुण जाखडे यांच्यासह अनेक लेखक-प्रकाशकांनी या विषयावर डॉ. यादव यांच्या अंत्यविधीदरम्यान भाष्य केले.

Web Title: Unreleased literature of Anand Yadav to be published