esakal | घोडेगावच्या उपसरपंचांनी स्वत:ची कार दिली रूग्णसेवेसाठी

बोलून बातमी शोधा

upsarpanch of Ghodegaon gave his own car for ambulance service
घोडेगावच्या उपसरपंचांनी स्वत:ची कार दिली रूग्णसेवेसाठी
sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव : दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा आंबेगाव तालुक्यात वाढत आहे. त्यातही मागील लाटेतही सुरक्षित राहिलेला पश्चिम आदिवासी भाग यावेळी बाधित झाला आहे. शासनाने सेवा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. परंतु रूग्णांची हेळसांड होवू नये, त्यांना येण्याजाण्याची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे व राम ग्रामीण पतसंस्थेने चालकासह वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे येथील रूग्णांना मोठा दिला मिळाला आहे.

हेही वाचा: ''कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करा''

कोरोना रूग्णांच्या वाढलेल्या परिस्थितीमुळे स्थानिक रूग्णवाहिका कमी पडत आहे. अनेक वेळा 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशी संपर्क होत नाही. घोडेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना आधार म्हणून उपसरपंच सोमनाथ काळे यांनी स्वतची ब्रीझा चार चाकी गाडी विनामूल्य ड्रायव्हर सह 24 तास उपलब्ध करून दिली आहे. तसेच राम ग्रामीण पतसंस्थेनेही चालकासह अ‍ॅमब्युलन्स विनामुल्य उपलब्ध करून दिली आहे. या सेवेमुळे मंचर येथे कोवीड रूग्णालयात व आदिवासी भागातील रूग्ण आणण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे.

हेही वाचा: वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील ४६ वृध्दांची कोरोनावर मात

''शासनाने मागील कोरोना लाटेत अ‍ॅम्ब्युलन्स अधिगृहित केली होती. त्यावेळी परिसरातील 25 गावांतील लोकांना लाभ झाला. आता संस्था स्वत सर्व खर्च करून लोकांच्या सेवेसाठीअ‍ॅम्ब्युलन्स दिली आहे. सोमनाथ काळे (उपसरपंच, घोडेगाव ग्रामपंचायत) कोरोनाच्या या लाटेत रोज मदतीसाठी फोन येतात. विशेषत कोरोना बाधितांना गाडी सहजासहजी मिळत नाही. परिसरातील 25 गावातील लोकांना माझी स्वतची वापर करत असलेली ब्रिझा गाडी लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असेल.''

- अक्षय काळे (उपाध्यक्ष राम ग्रामीण पतसंस्था)

हेही वाचा: कोथरुडच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळतोय मानसिक ओलावा