२३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश होणार? राज्य सरकारने मागितला अहवाल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

राज्यातील तत्कालीन सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 4 ऑक्‍टोंबर 2017 रोजी पहिल्या टप्प्यात 11 गावे समाविष्ट समाविष्ट करण्यात आली.

पुणे : उर्वरित 23 गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करावी की नाही, यासंदर्भात तातडीने आपला अभिप्राय सादर करावा, अशा सूचना पुन्हा एकदा राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने पुणे महापालिकेला दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत गावे घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका काय अहवाल पाठविणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

चोरीची शिक्षा भोगून बाहेर आले होते; पुन्हा चोरीमुळेच तुरुंगात गेले!​

राज्यातील तत्कालीन सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 4 ऑक्‍टोंबर 2017 रोजी पहिल्या टप्प्यात 11 गावे समाविष्ट समाविष्ट करण्यात आली. तर उर्वरित 23 गावे तीन वर्षात टप्याटप्प्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदतही संपुष्टात आली आहे. दरम्यान 15 ऑक्‍टोंबर रोजी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याचे उपसचिव सचिव मोघे यांनी महापालिकेला पत्र पाठवून उर्वरित गावे समाविष्ट करण्यासंदर्भात महापालिकेने आपला अभिप्राय कळवावा, असे पत्र पाठविले आहे. 

ही 23 गावे समाविष्ट करताना पाण्याची उपलब्धता आणि पाणी योजना, कचऱ्याचे नियोजन, प्रस्तावित रिंगरोड, वाढणारी लोकसंख्या आणि त्यांना सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आपल्याकडील उपलब्ध कर्मचारी वर्ग इत्यादी सर्व बाबींचा विचार करून तातडीने अभिप्राय सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. 

मारटकर खून प्रकरणाचा मास्टरमाईंड सापडला; पोलिसांनी कराडमध्ये केली अटक!

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. 2022 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यास वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी राहिला आहे. ही गावे हद्दीत घेतल्यानंतर त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार आहे. त्यामुळे ही गावे समाविष्ट करण्यास सध्या तरी भाजप अनुकूल नाही. तसेच ही गावे समाविष्ट करण्याऐवजी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे महापालिकेच्या हद्दीस समाविष्ट करण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात यावरून राज्य सरकार आणि महापालिका यांच्यातील वाद रंगण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!​

उर्वरित 23 गावे 
खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे, पिसोळी, शेवाळवाडी, काळेवाडी, वडाची वाडी, बावधन बुद्रूक, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, मंतरवाडी, नांदोशी, सूस आणि म्हाळुंगे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urban Development Department of the State Government has given instructions to the Pune Municipal Corporation to submit feedback regarding the inclusion of 23 villages in the municipal limits.