चोरीची शिक्षा भोगून बाहेर आले होते; पुन्हा चोरीमुळेच तुरुंगात गेले!

Crime_Arrest
Crime_Arrest

पुणे : वाहन चोरी, घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेल्या दोघांना खडक पोलिसांनी पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांनी चोरीच्या तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आत्तापर्यंत त्यांच्याकडून तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सचिन नरहरी पेशवे (वय 36) आणि प्रेम शालीकराम खत्री (वय 29 दोघेही सध्या रा. येवलेवाडी, मूळ रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांनी नावे आहेत. 13 ऑक्‍टोबर रोजी एक वृद्ध महिला मॉर्निंगवॉक करत शुक्रवार पेठ येथून जात होती. त्यावेळी पाठीमागून गाडीवर आलेल्या दोघांनी त्यांची सोनसाखळी चोरली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेत असताना पोलिस कर्मचारी अमेय रसाळ, समीर माळवदकर आणि बंटी कांबळे यांना पेशवे आणि खत्री खडी मशिन चौकातून दुचाकीवरून सारखे ये-जा करीत असताना दिसून आले. त्यामुळे खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा लावून दोघांना अटक केली.

खडी मशिन चौकातून दोघांना ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले. पोलिस तपासात त्यांनी शुक्रवार पेठ, निगडी आणि चिंचवड येथे वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण तीन लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे, पोलिस कर्मचारी अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, रवी लोखंडे, रोहन खैरे आणि योगेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पेशवेवर 39 तर खत्रीवर 10 गुन्हे दाखल :
पेशवे हा नागपूर, अमरावती जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी आहे. त्यावर आतापर्यंत 39 गुन्हे दाखल असून तो दीड महिन्यापूर्वी नागपूर कारागृहातून चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे. तर खत्री हा नागपूर, मध्यप्रदेश येथील वाहनचोरी आणि घरफोडी गुन्ह्यातील आरोपी असून त्यावर 10 गुन्हे दाखल आहे. खत्री हा 2015 साली नागपूर सेन्ट्रल जेलमधून पळाला होता. त्या गुन्ह्यात झालेली शिक्षा भोगून तो चार महिन्यापूर्वी बाहेर आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com