शिक्षकांविनाच उर्दू शाळा

Teacher
Teacher

पिंपरी - महापालिकेच्या माध्यमिक विभागाने चार वर्षांपूर्वी उर्दू माध्यमाच्या नव्याने सहा शाळा सुरू केल्या. मात्र त्यांना क्रमांक न दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्यावर होत आहे.

उर्दू माध्यमाच्या थेरगाव, दापोडी, खराळवाडी, नेहरूनगर, लांडेवाडी व रुपीनगर येथे नव्या शाळा सुरू केल्या. यामध्ये इयत्ता नववी व दहावीचे उर्दूचे वर्ग सुरू करून चार वर्षे झाली. मात्र, अद्यापही पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले गेलेले नाहीत. उन्हाळी सुटीनंतर १७ जूनला या शाळा पुन्हा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही शिक्षकांविनाच शाळा भरत आहेत. सहा शाळांसाठी प्रत्येकी तीन याप्रमाणे १८ शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. त्याला मागील शैक्षणिक वर्षातच सरकारची मान्यता मिळालेली आहे. 

शाळांना स्वतंत्र इंडेक्‍स व युडायस नंबर मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आकुर्डी माध्यमिक शाळांमधून प्रवेश व परीक्षेचा अर्ज भरावा लागतो. एकाही शाळेत शिक्षकांसाठी स्टाफ रूम नाही. किंबहुना टेबल, खुर्च्या, कपाटे आणि इतर आवश्‍यक सुविधाही दिल्या गेलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बाकांची संख्याही कमी आहे.

प्राथमिक शाळांमध्येही गैरसोयी
प्राथमिक शाळांची परिस्थितीदेखील माध्यमिक शाळांपेक्षा वेगळी नाही. या १४ उर्दू माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांची तब्बल ४५ पदे रिक्त आहेत. पुरेशा वर्गखोल्या नाहीत. खेळाचे मैदान नाही. क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची नेमणूक केलेली नाही. बहुतांश शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची स्थापनाही केली नसल्याची तक्रार भाजप युवती शहराध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com