
पुण्यातील औंध येथील जिल्हा आणि ससून रुग्णालय या दोन ठिकाणी नवजात अर्भकांवर उपचार करण्याची सुविधा आहे. ससून रुग्णलयात 59 तर जिल्हा रुग्णालयात 24 खाटांचे लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आहेत. भंडाऱयाची दुर्घटना घटना कळल्यानंतर या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी तातडीने इलेक्ट्रिकल आँडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला आग लागल्यानंतर पुण्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी आपल्या सर्व शिशू केअर युनिटचे इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे तातडीने आदेश दिले आहेत.
पुण्यातील औंध येथील जिल्हा आणि ससून रुग्णालय या दोन ठिकाणी नवजात अर्भकांवर उपचार करण्याची सुविधा आहे. ससून रुग्णलयात 59 तर जिल्हा रुग्णालयात 24 खाटांचे लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आहेत. भंडाऱयाची दुर्घटना घटना कळल्यानंतर या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी तातडीने इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
RBI द्वारे सहा नव्या पेमेंट वॉलेटची सुविधा; विना इंटरनेट आवाजाद्वारे करु शकाल व्यवहार
ससून रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अंतर्गत येते. तर, जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाचा भाग आहे. या दोन्ही खात्यांनी आपापल्या कक्षेतील रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागाची सद्यःस्थिती तपासून त्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबत सार्वजनिक रोग्य खात्याच्या पुणे परिमंडळचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख म्हणाले, “पुणे परिमंडळातील पुणे, सातारा आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांमध्ये अतीदक्षता विभाग आहे. पुण्यात 24 तर सातारा, कराड, पंढरपूर या तीनही ठिकाणी प्रत्येकी 12 खाटांचे युनिट आहे. या प्रत्येक ठिकाणच्या फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
हेही वाचा - ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद
पुण्याच्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकीत्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, “इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रिकल वायरची सद्यःस्थिती काय आहे, प्रत्येक युनिटमधील वायरिंग व्यवस्थित आहे का, याची बारकाईने तपासणी यात होणार आहे.”
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, “ससून रुग्णालयात 59 खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग आहे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या विभागाचे नियमित फायर ऑडिट करण्यात येते. तसेच, येथे स्प्रिंकलरची सुविधा आहे. त्यामुळे आगीच्या दुर्घटनेच स्प्रिंकलर सुरू होत असल्याने संभाव्य जीवितहानी टाळली जाते.”
हेही पहा - अमेरिकेतील US Capitol मध्ये नेमकं काय आणि का घडलं?