
Stormy gram sabha in Uruli Kanchan; villagers protest in scorching heat.
Sakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात बुधवारी (ता. १७) सर्वत्र झाली. या अनुषंगाने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतमध्ये या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी ग्रामसभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. मागील ग्रामसभेचे कामकाज, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - ग्रामस्तरीय समिती स्थापन करणे, अभियान राबविणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती निवड, संत गाडगेबाबा अभियान समिती निवड, ऐनवेळी येणारे विषय हे ग्रामसभेचे विषय होते. मात्र, सदर ग्रामसभा वादावादीमुळे गाजली असून भर उन्हात ग्रामस्थांचे हाल झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण हाेते.