द्वीपक्षीय संबंधांसाठी इंग्लिश भाषा उपयुक्त

प्रसाद पाठक
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे: "भारतीयांमध्ये कमालीची गुणवत्ता आहे. शिक्षणाप्रती त्यांची आस्था, आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा उच्च असून, भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत स्वागतच आहे. एकमेकांमधील संवादासाठी इंग्लिश ही उत्तम भाषा आहे. सांस्कृतिक व शिक्षणविषयक कार्यक्रमांसाठी; तसेच द्वीपक्षीय संबंधासाठी भागीदारी उपयुक्त ठरेल,'' असे मत युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिकाचे काउन्सूल जनरल इडगार्ड डी. कॅगन यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन लॅंग्वेज येथे अमेरिकेच्या अर्थसाह्याने पुण्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश संभाषण वर्ग घेण्यात येत आहेत. भारतात पाच ठिकाणी हा वर्ग घेण्यात येत असून, दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. पुण्यातली ही पहिलीच बॅच आहे. विद्यार्थ्यांचे इंग्लिश भाषेतील संभाषण कौशल्य जाणून घेण्यासाठी काउन्सूल जनरल कॅगन यांनी इन्स्टिट्यूटला शुक्रवारी (ता. 13) भेट दिली. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, संचालक शिरीष सहस्रबुद्धे उपस्थित होते.

कॅगन म्हणाले, ""मुलांचे इंग्लिश संभाषण ऐकून मी प्रभावित झालो. भाषा शिकून घेणे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या निश्‍चितच भारताबरोबर भागीदारी करायला आवडेल. विशेषत्वाने व्यक्ती-व्यक्तीतील संवादावर आमचा भर राहील. द्वीपक्षीय संबंधांसाठीदेखील इंग्लिश भाषेचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरेल.''

डॉ. येरवडेकर म्हणाल्या, ""अमेरिकेच्या अर्थसाह्याने विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषा शिकविण्यात येते. त्याप्रमाणे अमेरिकेतील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकविण्यासाठी सिंबायोसिसचा प्रयत्न आहे.''

Web Title: usa edgard d kagan in pune