सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा - वेंकटेशम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

वारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन पुण्याचे पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केले. 

पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने हेल्मेट वापराविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वेंकटेशमबोलत होते. या वेळी वाहतूक विभागाच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते, पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष समीर लडकत व तिन्ही कंपन्यांचे असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच १५० पंपमालक उपस्थित होते.

वेंकटशम म्हणाले, ‘‘कंट्रोल रूमला रोज तक्रारींचे २७००० कॉल येत होते. ते आता रोज १५०० पर्यंत येऊ लागले आहेत. गुन्हेगारांवर सतत पोलिसांनी लक्ष ठेवल्याने शहरात वीस टक्के गुन्हे कमी झाले आहेत. पोलिस जास्तीत जास्त लोकांमध्ये असतील. मी त्यांना पेपर कामात अडकवणार नाही. तसेच महिला सहायक केंद्र जास्त सक्षम करणार असून, त्यामध्ये स्त्रियांना मोफत कायदेविषयक सल्ला, समुपदेशन, सामाजिक मदत, डॉक्‍टर्स अशा सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळतील, अशी सोय सुरू केली आहे. पुण्यात प्रत्येकाला पासपोर्ट सहा दिवसात कसे मिळतील यात लक्ष घालणार आहे. पुण्यात रोज अंदाजे ४००० पासपोर्ट दिले जातात.’’

लडकत म्हणाले, ‘‘हेल्मेट वापराच्या अभियानाला आमच्या अससोसिएशनचा पूर्ण पाठींबा आहे. सध्या एकीकडे इलेक्‍ट्रिक कारला प्राधान्य दिले जात असताना नवीन ५५ हजार पंप सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. ही पूर्णपणे परस्पर विरोधी पॉलिसी आहे. याला आमचा विरोध आहे.’’ 

Web Title: Use helmet for safety says venkatesham police commissioner