नागरिकांनो! मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

विभागीय आयुक्त डॉ.  म्हैसेकर आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीची बुधवारी पाहणी केली. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली. कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग ठेवा,  प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत ना, अशी आस्थेवाईकपणे चौकशी करत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ताडीवाला रोड परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

विभागीय आयुक्त डॉ.  म्हैसेकर आणि साखर आयुक्त सौरभ राव यांनी ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीची बुधवारी पाहणी केली. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली. कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी त्यांनी ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुणे महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले प्राथमिक विद्यालयातील स्वॅब तपासणी केंद्राला आणि संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांच्या विविध कक्षांना भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या साफसफाईबाबत माहिती घेतली. नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करताना कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सूचना केल्या.   

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

पाटील इस्टेटसह विविध भागांतील परिस्थितीची पाहणी
शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट नजीक उभारण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्राची डॉ. म्हैसेकर, राव आणि पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी पाहणी केली. डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय,  कॅम्प तसेच शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, इराणी वस्ती, पाटकर प्लॉट, महात्मा गांधी वसाहत येथे डॉ. म्हैसेकर यांनी भेट दिली. संसर्ग चाचणी केंद्रात तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, बाधित रुग्णसंख्या, मृत्यूदर, चाचणी केंद्रामधून करण्यात येणारा औषधोपचार याबाबत माहिती घेतली. पुरेसे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध असल्याबाबत माहिती खात्री केली.  प्रशासनाच्यावतीने आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. म्हैसेकर यांनी दिले. 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use mask, sanitizer and keep social distance said Dr deepak maheshkar