गूळ तयार करण्यासाठी मुदतबाह्य चॉकलेटचा वापर; गुऱ्हाळ चालकावर कारवाई

गूळ तयार करताना खाण्यास योग्य नसलेल्या मुदतबाह्य चॉकलेटचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
crime news
crime newsesakal
Summary

गूळ तयार करताना खाण्यास योग्य नसलेल्या मुदतबाह्य चॉकलेटचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

पुणे - गूळ तयार करताना खाण्यास योग्य नसलेल्या मुदतबाह्य चॉकलेटचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील एका गुऱ्हाळ चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह देशात २०११ पासून लागू झाला आहे. नागरिकांना सुरक्षित, सकस अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे, हा कायद्याचा उद्देश आहे. काही गूळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गूळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केल्यानंतरही चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासनाने राहू येथे कारवाई केली.

त्यावेळी संबंधित गुऱ्हाळ चालक हा मुदतबाह्य आणि खाण्यास अयोग्य चॉकलेट वापरून विनापरवाना गूळ उत्पादन करीत असल्याचे आढळून आले. या पदार्थाचे नमुने घेत ५२ हजार रुपये किमतीच्या मुदतबाह्य चॉकलेटचा साठा जप्त करण्यात आला. सहायक आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी गुऱ्हाळ चालक उस्मान मयूर यांच्याकडून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. चीतपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सर्व गुऱ्हाळ चालक- मालकांनी परवाना घेऊनच गूळ उत्पादन करण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com