उपचारपद्धतीत स्टेम पेशींचा वापर वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपचारपद्धतीत स्टेम पेशींचा वापर वाढला

उपचारपद्धतीत स्टेम पेशींचा वापर वाढला

पुणे : आधुनिक विज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात नवीन उपचारपद्धती विकसित करण्यात येत असून, त्यासाठी आण्विक रसायनशास्राच्या गुंतागुंतीचा अभ्यास केला जात आहे. अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्टेम पेशींचाही वापर वाढत आहे, असे मत केंद्र सरकारच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे सचिव प्रा. संदीप वर्मा यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: "तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा पवारांना टोला

प्रा. वर्मा यांनी ‘पेप्टाइड बेस्ड स्ट्रॅटेजीज इन केमिकल न्यूरोसायन्स अँड स्टेम सेल इंजिनियरिंग’ या विषयावर ६१वे प्रा.आघारकर स्मृती व्याख्यान दिले. महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी-आघारकर संशोधन संस्थेने आज येथे संस्थेचे संस्थापक-संचालक प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. प्रसिद्ध मायकोलॉजिस्ट डॉ. एम. सी. श्रीनिवासन प्रमुख पाहुणे होते. वर्धीनीचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर यांनी संस्थेच्या संशोधनातील उपलब्धी विशद केल्या. पीक जातींच्या विकासामध्ये संस्थेचे योगदान आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. संस्थेने हायड्रोजन इंधन, नॅनोबायोसायन्स, जैवविविधता अभ्यास इत्यादींच्या विकासामध्ये योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

हेही वाचा: ‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

यावेळी डॉ. संतोष जायभाय यांचे ‘सोयाबीनची लागवड’ या विषयावरील मराठीतील पुस्तक, डॉ. विनया घाटे आणि नम्रता गायकवाड यांचे ‘सीड मॉर्फोलॉजी ऑफ हाय व्हॅल्यू मेडिसिनल प्लांट्स’, आणि डॉ. श्रीनिवासन आणि डॉ. एस. के. सिंग यांचे ‘प्रॅक्टिकल गाईडबुक टु एकटीनोमाईसीट बायोलोजी अँड टेक्नॉलॉजी अप्लिकेशन’ या पुस्तकांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वंदना घोरमाडे यांनी केले तर डॉ.गुरूदत्त वाघ यांनी आभार मानले.

loading image
go to top