योग्यवेळी किटकनाशकांचा वापर करेल हुमणी किडीचा बंदोबस्त : डॉ. पांडुरंग मोहिते

Use pesticides at the right time says Dr Pandurang Mohite
Use pesticides at the right time says Dr Pandurang Mohite

जुन्नर - कमी होत चाललेल्या पर्जन्यमान व ग्लोबल वॉर्मिंगमुळे हुमणी कीड उग्ररुप धारण करण्याची शक्यता असल्याने पिकांमध्ये योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला तरच हुमणी किडीचा बंदोबस्त करता येईल असे कोल्हापूर येथील हुमणी किड संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग मोहिते यांनी ओझर ता.जुन्नर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना सांगितले. 

येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर होते. उपाध्यक्ष अशोक घोलप, मृदुशास्त्रज्ञ व द्गाक्षमित्र  
डॉ. जयराम खिलारी, स्मार्टकेमचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, योगेश म्हसे, श्री विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष शाकूजी कवडे, विघ्नहर कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्ग जंगले, सचिव अरुण थोरवे,  सरपंच अस्मिता कवडे, प्रगतशिल शेतकरी तान्हाजी बेनके, प्रशांत देशमुख, रामदास बोर्‍हाडे, जगन कवडे, सुखदेव नेहरकर, विजय भोर, सुनिल कवडे, सुभाष पडवळ, बाळाभाऊ विश्वासराव, भास्कर डुंबरे, भानुदास पानसरे तसेच कारखान्याचे शेतकी विभागाचे कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

डॉ. मोहिते म्हणाले, हुमणीच्या नियंत्रणासाठी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन ते नष्ट करणे हा उपाय असून विघ्नहर कारखान्याने हुमणीचे भुंगेरे पकडून नष्ट करण्याचा राबविलेला उपक्रम ऊस उत्पादकांच्या दृष्टीने उपयोगी आहे. कारखान्याच्या शेती  विभागाकडून ऊस उत्पादकांना होत असलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी हुमणीकिड नियंत्रणासाठी उपाययोजना करत आहे यामुळे ऊस पिकाचे होणारे नुकसान निश्चितपणाने टाळता येणार आहे.
डॉ. जयराम खिलारी म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी या किडीच्या प्रादुर्भावामुळे द्गाक्ष पिकाचे उच्चाटन झाले  होते.तसेच सध्या हुमणीकिडीने सगळीकडे हाहाकार माजविला आहे. हुमणी किडीच्या बंदोबस्तासाठी नव्याने संशोधन होणे गरजेचे आहे.

सत्यशिल शेरकर म्हणाले, राज्यात हुमणी किडीने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले असून शेतकरी वर्गाला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.विघ्नहर कारखान्याकडून हुमणीकिड नियंत्रणाकरीता उपायोजना केल्या जात असून गाळप हंगाम २०१७-१८ मध्ये सुमारे ३ टन २९२ किलो हुमणीचे भुंगेरे शेतकर्‍यांमार्फत पकडून घेवून ते जाळून नष्ट केले. याकरीता प्रतिकिलो रुपये-३००/- प्रमाणे सुमारे २९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. सुत्र संचालन प्रमुख शेतकी अधिकारी गोरखनाथ उकिर्डे यांनी केले. आभार उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com