बनावट नंबर टाकून आठ महिने दुचाकी वापरणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

वारजे माळवाडी - नवीन दुचाकीची नोंदणी न करता बनावट नंबर टाकून आठ महिने गाडी वापरल्याने, तसेच अल्पवयीन मुलाला ही दुचाकी चालवण्यास दिल्याबद्दल वडील, चुलत्याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. 

धनंजय हनुमंत बनसोडे (रा.सुर्यादत्त कॉलेज, संतोष दगडी चाळ) व करण हनमंत बनसोडे असे अटक झालेल्यांची नावे आहेत. नवीन गाडीची परिवहन प्रादेशिक कार्यालयात (आरटीओ) नोंदणी न करता आल्याने हे दोघे गेल्या आठ महिन्यापासून बनावट नंबर लावून ही दुचाकी चालवीत आहे. ही गाडी त्यांचा अल्पवयीन मुलगा चालवत असल्याने चांदणी चोकात पोलिसांनी त्याला अडविले असता हा प्रकार समोर आला. 

पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 
रस्ता वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरू असल्याने चांदणी चौक येथे फोउजदर सुबराव लाड, पोलिस हवालदार तानाजी नांगरे, पोलिस नाईक अविनाश गोपनर, पोलिस नाईक किरण पवार, रविंद्र अहिरे, योगेश वाघ, सुजय
पवार प्रबोधन व कारवाई करीत होते. त्यावेळी लहान मुलगा MH 12 PR 0789  या क्रमांकाची अॅक्टीवा गाडी चालवत होता. त्याला थांबवून त्याच्याकडे त्याचे नाव पत्ता, वय, लायसन्स व गाडीचे कादपत्राबाबत विचारणा केली. त्याने तो सुर्यदत कॉलेज समोर, पाटील नगर बावधन येथे राहणारा असून तो 14 वर्षाचा असल्याचे सांगितले. याबाबत, अधिक चौकशी केली असता. गाडीचा नंबर बनावट असल्याचे लक्षात आले. 

वारजे वाहतुक विभागाच्या या पथकाने चांगली कामगिरी केली आहे. सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. नागरिकांना वाहतूकीचे नियम त्यांची ओळख, माहिती जनजागृती करणे हा त्यातील उद्देश आहे. वाहतूक सुरक्षित होण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी नाही. पालक नागरिकांनी देखील नियम पाळले पाहिजेत. दुचाकी, चारचाकी वाहन लहान मुलांना दिले जाते. अशा प्रकारे लहान मुलांनी गाडी चालविली असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई सुरू आहे. 
प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

Web Title: using bike with dummy numbers for eight months