
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सध्या उस तोडणीचे काम जोरात सुरु आहे. दरम्यान, गणेगाव खालसा येथे उस तोडणी मजुर अंकुष बंडु वाघ(रा. देवघट, ता. मालेगाव, जि. नाशिक) यास विषारी साप चावल्याची घटना घडली. त्यानंतर औषध उपचारासाठी दवाखान्यात घेऊन न जाता त्याला मांत्रिकाकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली मिळाली.
पुणे : ऊसतोड करताना एका शेत मजुराला अचानक एक विषारी साप चावला. साप चावल्यानंतर त्याला ताताडीने वैदयकीय उपचार देण्याऐवजी त्याला मांत्रिकाकडे नेऊन विष उतरविण्यासाठी अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, पोलिसांना वेळीच खबर मिळाली आणि त्यांना हा प्रकार थांबविला. मजुराला वेळीच वैदयकीय उपचार मिळाल्याने त्याचा जीवही वाचला. दरम्यान या प्रकरणी मांत्रिकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द रांजणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात सध्या उस तोडणीचे काम जोरात सुरु आहे. दरम्यान, गणेगाव खालसा येथे उस तोडणी मजुर अंकुष बंडु वाघ(रा. देवघट, ता. मालेगाव, जि. नाशिक)यास विषारी साप चावल्याची घटना घडली. त्यानंतर औषध उपचारासाठी दवाखान्यात घेऊन न जाता त्याला मांत्रिकाकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली मिळाली. त्यानुसार रांजणगाव पोलिस निरिक्षक सुरेश कुमार राऊत यांनी पोलिस पथक आणि अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते यांच्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर उसतोड मजुराची मांत्रिकाच्या तावडीतून सुटका करत त्याला तातडीने उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने उस तोड मजुराचे प्राण वाचवता आले. या प्रकरणी मांत्रिक जयवंत शिंदे याला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुध्द पोलिस पाटील विनायक दंडवते यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सु्रेशकुमार राउत, पोलिस नाईक एम.बी.काळकुटे, व्ही.पी.मोरे, व्ही.एन, मोहिते, आर.बी.होळनोर, महिला पोलीस अंमलदार शुभांगी पवार, निर्मला ओव्हाळ यांच्या पथकाने केली.
जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर