उत्तर प्रदेशात तब्बल ३५ चकमकी

उत्तर प्रदेशात तब्बल ३५ चकमकी
Published on

उत्तर प्रदेशात
तब्बल ३५ चकमकी

गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई; तिघांचा मृत्यू

लखनौ, ता. ८ (पीटीआय) : उत्तर प्रदेशात पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, बुधवार व गुरुवारी (ता. ६, ७) पोलिसांच्या गुन्हेगारांबरोबर ३५ चकमकी झाल्या. यामध्ये तीन गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून, ३६पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तसेच, ६० जणांपेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातूनच या चकमकी झाल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नांमध्ये गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. गुन्हेगारांच्या तीन मृत्यूंपैकी दोन गुन्हेगार बवारिया टोळीतील असून, मथुरा येथे त्यांनी एका कुटुंबाला ओलिस ठेवले होते. दोन्ही गुन्हेगार राजस्थानातील आहेत. तर, हरदोई येथे सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करून, त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचाही चकमकीमध्ये मृत्यू झाला. सर्वाधिक सात चकमकी मुझफ्फरनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. या सर्वच प्रकरणांतील आरोपींचा चोरी, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये शोध घेण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com