esakal | बारामतीत क्रेडाईकडून कामगारांसाठी लसीकरण मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत क्रेडाईकडून कामगारांसाठी लसीकरण मोहिम

बारामतीत क्रेडाईकडून कामगारांसाठी लसीकरण मोहिम

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : बांधकामावर काम करणा-या कर्मचा-यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज क्रेडाई संस्थेस केली. बांधकाम कामगारांसाठी मोफत लसीकरण मोहीम ही महाराष्ट्रातील पहिलीच असून त्याचा प्रारंभ बारामतीमधून झाला आहे. पहिल्याच दिवशी 600 कामगारांनी लस घेतली. या मोहिमेअंतर्गत 2000 कामगारांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे यांनी सांगितले.

कामगारमंत्री हसन मुश्रीफ, प्रधान सचिव श्रुती विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाईने हा कार्यक्रम पार पाडला. या प्रसंगी सुरेश जाधव यांच्यासह अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उपायुक्त अभय गीते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे उपस्थित होते.

हेही वाचा: खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुरेन्द्र भोईटे, सचिव राहुल खाटमोडे, खजिनदार भगवान चौधर, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सहसचिव राजेंद्र खराडे, हेमंत भोंग व क्रेडाई सदस्य यांनी परिश्रम घेतले. सुरेंद्र भोईटे यांनी प्रास्ताविक केले.

loading image
go to top