esakal | फक्त दुसऱ्या डोससाठी पुण्यात आज लसीकरण; १८ ते ४४ वयोगटासाठी पाच केंद्रे

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
फक्त दुसऱ्या डोससाठी पुण्यात आज लसीकरण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारकडून महापालिकेला(PMC) २० हजार कोव्हिशील्ड (Covishield) आणि १० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. १८ ते ४४ वयोगटाचा पहिला डोस आणि ४५ च्या पुढील गटासाठी फक्त दुसऱ्या डोससाठी(Secoand Dose of vaccine) पात्र आहेत, अशांनाच बुधवारी (ता. ५) ही लस दिली जाणार आहे. २० मार्चपूर्वी कोव्हिशील्ड(Covishield) व ५ एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतलेलेच दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. (Vaccination for second dose only in Pune today Five centers for 18 to 44 year old people)

हेही वाचा: लाईट... ॲक्शन... कॅमेरा...; चित्रीकरणासाठी आठवडाभरामध्ये परवानगी

चार दिवसांचा खंड पडल्यानंतर ३० हजार डोस पुणे शहराच्या वाट्याला आलेले आहेत. तसेच पालिकेकडे यापूर्वीचे दोन्ही लसींचे काही डोस उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग केला जाणार आहे. ४५ ते ५९ आणि ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, सध्या लसींचा तुटवडा असल्याने व दुसरा डोस देखील वेळेत घेणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने तूर्त दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. ५) केवळ दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्यांचेच लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ९७ केंद्रांवर कोव्हिशील्ड तर १८ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असणार आहेत. ४५ ते पुढील वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जाणार नाही.

हेही वाचा: आई-पत्नीचे दागिने गहाण ठेवून केले कोविड हॉस्पिटल सुरू

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय व येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय येथे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी या दोन्ही ठिकाणी कोव्हशील्ड लसीचे ६६८ जणांना पहिला डोस देण्यात आला. या गटासाठी आणखी तीन केंद्र वाढविण्यात आले आहेत. कोथरूड येथील सुतार दवाखाना, हडपसर येथील मगर दवाखाना व सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखाना येथेही या गटासाठी कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. या पाचही केंद्रांवर केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाणार आहे. नोंदणी न करता थेट केंद्रांवर आलेल्यांना लस दिली जाणार नाही. त्यामुळे विनाकारण गर्दी करून गोंधळ घालू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: माणसांमुळे प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा धोका

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा