esakal | महापालिका हद्दीतील लशीकरणात खोळंबा नको; त्रुटी दूर करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका हद्दीतील लशीकरणात खोळंबा नको; त्रुटी दूर करण्याची मागणी

महापालिका हद्दीतील लशीकरणात खोळंबा नको; त्रुटी दूर करण्याची मागणी

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : लसीकरणासाठी नागरिकांच्यामध्ये जनजागृती झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत असताना प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे लस उपलब्ध न झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची प्रशासनाकडे केली आहे. लसीकरण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. परंतु लसीकरणात येत असलेले अडथळे ओळखून नगरसेविका नागपुरे यांनी प्रशासनाकडे लसीकरण प्रक्रियेबद्दल आक्षेप नोंदवत मागण्या केल्या.

हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

लसीकरणाच्या नियोजनातील ढिसाळपणा त्वरित दूर केला पाहिजे. लस उपलब्ध होणार आहे की नाही याची माहिती अगोदर सार्वजनिक करावी. तसेच, एक मे पासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू केल्यामुळे होणारी गडबड टाळण्यासाठी आता उरलेल्या दिवसात प्राधान्याने ४५वरील व्यक्तींना दुसरा डोस द्यावा. लसीकरण केंद्रांवर नागरिक गर्दी करत आहेत. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील. याबाबत आयुक्तांची भेट घेणार असे नागपुरे यांनी सांगितले.

loading image
go to top