लसीकरणातही वशिलेबाजी; नोंदणी नसतानाही दिली जातेय लस

Corona vaccinations
Corona vaccinationsEsakal

पुणे pune news- ‘लस मिळावी म्हणून शहरातील तरुण हातात मोबाईल घेऊन ऑनलाइनसाठी प्रयत्न करत आहेत, अवघ्या दोन मिनीटात स्लॉट बुक होत आहेत, असे असताना लसीकरण (Vaccination) केंद्रांवर मात्र, ज्यांचा वशिला आहे अशांची घुसखोरी होत असून, ऑनलाइन नोंदणी (registration) न करता देखील त्यांना लस दिली गेली आहे. शनिवारी शहरात अशा ४६ लस दिल्या आहेत. पुण्यात आत्तापर्यंत एकूण दोन्ही डोस मिळून ८ लाख ८३ हजार ५४२ जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये ८ लाख ७२ हजार ४९० जण हे ४५ ते पुढील गटातील तर, ११ हजार ५२ जण हे १८ ते ४४ या गटातील आहेत. पुण्यासाठी आवश्‍यक त्या प्रमाणात लस मिळत नसल्याने लसीकरण केंद्रावरील ३०० ते ४०० लोकांपैकी १०० जणांनाच लस मिळत असल्याने केंद्रांवर गोंधळ होत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी कोवीन ॲपवरून लसीकरण केंद्र व वेळेची नोंदणी निश्‍चित करतील अशांनाच लस मिळत आहे. या गटाची लस ४५ ते पुढील गटाला लस दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. १८ ते ४४ गटासाठी अवघे २-३ हजार लस उपलब्ध होत असल्याने अवघ्या दीड ते दोन मिनीटात बुकींग फुल्ल होत आहे.(Vaccination Vaccines are given without registration pune)

Corona vaccinations
लसीकरण नोंदणीचा आनंद औटघटकेचा; अनेकांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त

हजारो तरुण रोज रात्री आठ वाजता नोंदणीसाठी प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. असे असताना प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नगरसेवक, आमदार, राजकीय पक्षाचे, संस्था- संघटनांचे कार्यकर्ते यामुळे नियमांना फाटा देऊन घुसखोरी करून आपल्या मर्जीतील लोकांचे लसीकरण करून घेत आहेत. शनिवारी शहरात १८ ते ४४ याच वयोगटातील नागरिकांसाठी चार केंद्रावर लस उपलब्ध होती, तरीही ४५ ते पुढील वयाच्या गटातील ४६ जणांनी चार लसीकरण केंद्रावर नियमबाह्यपणे लस घेतल्याचे महापालिकेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

‘१८ ते ४४ साठी ज्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे अशांचेच लसीकरण केले जाईल. इतर गटातील नागरिकांचे लसीकरण केले जाऊ नयेत. राजकीय असो किंवा कोणी असो सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे लसीकरण केले जात असल्यास चौकशी केली जाईल, असं अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाले.

Corona vaccinations
दुसऱ्या डोसासाठी ज्येष्ठांची वणवण! लसीकरण केंद्रांवर विदारक स्थिती

शनिवारी झालेले लसीकरण

गट - पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - ० - ०

फ्रंट लाइन कर्मचारी - २ - १७

ज्येष्ठ नागरिक - ८ - ६

४५ ते ५९ वयोगट - २३ - ८

१८ ते ४४ वयोगट - १७७० - ०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com