
वाघोली: वाघोली येथील बी. जे. एस. लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपला आहे. यामुळे आज नागरिकांना लसीकरणा विना परतावे लागले. येथील केंद्रावर शनिवार पर्यंत 3489 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यातील 690 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. वाघोलीसह अन्य गावातील नागरिकही लसीकरणासाठी वाघोली केंद्रावर येतात. वाघोलीत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 3247 झाला आहे. त्यापैकी 3069 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्या 147 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
1 मार्च पासून दररोज कोरोना रुग्णात दोन आकडी संख्येने वाढ होत आहे. बरे होणाऱ्यांची टक्केवारी 95 टक्के आहे. वाढत्या कोरोनामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. वाघोली प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या पाच गावात एकूण 17850 लाभार्थी आहेत. त्यातील 10853 लाभार्थी हे जेष्ठ नागरिक आहेत. तर अन्य जणांना इतर आजार आहे.
''साठवणूक केंद्रातच लस शिल्लक नसल्याने ती उपलब्ध होऊ शकली नाही. सायंकाळ पर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे'' अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी दिली. लसीचा तुटवडा होऊ देऊ नये तसेच त्वरित लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.