वडगाव पूल ते नवले पूल जोडणार; NHI चा पालिकेकडे आराखडा

अपघात टाळण्यासाठी नवले पूल ते वडगाव पूल या दरम्यान नव्याने पूल बांधून राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे.
Navale Bridge Pune
Navale Bridge PuneSakal

पुणे : नवले पुलाच्या परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) महापालिकेकडे सादर केला. अपघात टाळण्यासाठी नवले पूल ते वडगाव पूल (Navle Bridge to Vadgaon Bridge) या दरम्यान नव्याने पूल बांधून राष्ट्रीय महामार्ग जोडला जाणार आहे. सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा अल्पकालीन उपाययोजनाही यात सुचविण्यात आलेल्या आहेत. मात्र, या उपाययोजना प्रत्यक्षात कधी येतील हे या बैठकीत स्पष्ट झालेले नाही. (Navale Bridge Development)

नवले पुलाच्या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एनएचएआयला आठ दिवसात अहवाल सादर करा असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी हा अहवाल देण्यात आलेला नव्हता. ‘सकाळ’ने अद्याप अहवाल दिलेला नाही याचे वृत्त देऊन प्रशासकीय अनास्था समोर आणली. त्यानंतर आज (ता. १७) महापालिकेत नवले पुलाच्या सुधारणांवर सादरीकरण करण्यात आले. मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

Navale Bridge Pune
अजब कारभार; फ्रीजमध्ये ठेवलेली लस टोचल्याने बालकांचा मृत्यू

एनएचएआयचे प्रकल्प संचालक कदम यांनी सादरीकरण करताना एनएचएआयतर्फे वडगाव ते नवले पूल हा भाग नवीन पुलाने जोडावा लागणार आहे. त्यामुळे मोठी वाहने थेट शहराबाहेर निघून जातील, अपघात होणार नाहीत असे सांगितले. तसेच या महामार्गालतची अतिक्रमणे काढणे, सर्व्हिस रस्त्याचे काम करणे आवश्‍यक

आहे, असे सांगितले. तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ‘‘जी कामे तातडीने करावी लागणार आहेत त्यांची स्वतंत्र मांडणी करावी व जी दीर्घकालीन आहेत त्यांची वेगळी यादी करावी’’ अशी सूचना या बैठकीत केली.

Navale Bridge Pune
५१ लाखांचे अवैध चलन बाळगणाऱ्या प्रवाशाला दिल्लीत अटक

तसेच वडगाव पुलावरून मुंबईकडे जाण्यासाठी व पुण्याकडे येण्यासाठी दोन छोटे सेवा रस्ता पूल उभारावेत, कात्रज नवीन बोगदा ते नवले पुला पर्यंत दोन ठिकाणी कायमस्वरूपी स्पीड गन असाव्यात, सूचना फलक रस्त्याच्या डाव्या बाजूला न लावता, ते दुभाजकावर लावावेत, रात्रीसाठी फ्लिकरींग दिवे बसविण्यात यावे, अनावश्‍यक पंक्‍चर बंद करावेत अशी सूचना महापालिकेने केल्या आहेत.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत महापालिका आणि एनएचआय यांनी नवले पुलाच्या परिसरात वाहतूक सुधारणांसाठीचा आराखडा सादर केला. दोन्ही विभाग एकमेकांशी समन्वय ठेऊन तातडीने सुधारणा करून अपघात कमी करण्याचा प्रयत्न करतील.

बैठकीत एनएचआयने सुचविलेल्या उपाय योजना

  • - नर्ऱ्हे- आंबेगाव स्मशानभूमीची जागा मिळाल्यास अर्धवट सेवा रस्ता पूर्ण करणार

  • - रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्ता लक्षात येण्यासाठी थ्रीडी थर्मोप्लासट मारणार

  • - वडगाव पूल ते नवले पूल नवीन पुलाने जोडणार

  • - नवले पूल ते दरी पुलापर्यंत नो पार्किंग करणार

  • - ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी पथदिवे तातडीनं उभारणार

  • - महामार्गावर प्रत्येक ५०० मीटरवर रंबलर टाकणार

  • - सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे प्राधान्याने काढली पाहिजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com