rasai devi
rasai devi

Navratri: नऊ दिवसांचा उपवास, नऊ दिवस पलंगावर झोपणे वर्ज्य, नवसाला पावणारी वडगाव रासाईची रासाई देवी

आंधळगाव, ता. २३ : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रासाईदेवी ही रेणुका देवीचे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.
वडगाव येथील रासाईदेवी मंदिरात घटस्थापनेपासून नऊ दिवस गावकऱ्यांकडून सकाळी ११ ते ४ पर्यंत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू असते. नऊ दिवस देवीचे भागवत पारायण केले जाते. दररोज रात्री जागरण गोंधळ, छबिना व आरती केली जाते. यावेळी सर्व गावकरी उपस्थित राहतात.
तसेच सातव्या दिवशीच्या माळेला पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर इत्यादी ठिकाणाहून रासाई देवीच्या यात्रेसाठी भक्तगण गर्दी करतात येतात. आठव्या दिवशी होम हवन झाले. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता मिरवणूक निघणार आहे. नऊ दिवस गावातील नाभिक बांधवांकडून आपली दुकाने बंद ठेवली जातात. तसेच गावातील नागरिक कटाक्षाने उपवास धरतात. नऊ दिवस पलंगावर झोपणे गावात वर्ज्य केले जाते. रासाई देवी हे मुख्यतः येथील ढवळे व शेलार यांचे कुलस्वामिनी दैवत आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची राज्यभर ख्याती आहे.
देवस्थानच्या वतीने शंभर भाविक भक्त राहू शकतील असा भक्त निवास तयार केला आहे.
नऊ दिवस वेगवेगळ्या मानकऱ्यांच्या वतीने देवीला वस्त्र परिधान केले जातात. गावातील गोंधळी आराधी हे पारंपारिक पद्धतीने या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात जागरण गोंधळ करतात. राजेंद्र सदाशिव शेलार गुरव यांच्याकडून देवीची नियमित पूजा केली जाते.

काठीचा मान
देलवडी (ता. दौंड) येथील शेलार कुटुंबीय सूर्योदयावेळी देलवडी ते वडगाव रासाई २० किमी अंतर मानकरी रासाई देवीची काठी घेऊन जातात. तोपर्यंत वडगाव रासाई येथील ग्रामस्थ, भाविक भक्तगण गावाच्या वेशीवर देवीच्या काठीची वाट पाहतात, ग्रामस्थ या काठीचे स्वागत करतात. यात्रेचा पहिला मान हा देलवडी येथील शेलार कुटुंबीयांना असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com