Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात सकाळच्या तुलनेत तिप्पटीने मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघमध्येही सकाळच्या सत्रामध्ये पावसाचे सावट कायम राहिले. त्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 3. 68 टक्के इतके मतदान झाले होते, मात्र पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे सकाळच्या तुलनेत तिपटीने म्हणजे 11.76 टक्के इतके मतदान झाले.

पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघमध्येही सकाळच्या सत्रामध्ये पावसाचे सावट कायम राहिले. त्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 3. 68 टक्के इतके मतदान झाले होते, मात्र पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले, त्यामुळे सकाळच्या तुलनेत तिपटीने म्हणजे 11.76 टक्के इतके मतदान झाले.

वडगाव शेरी मतदारसंघमध्ये सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यास नागरीकांनी प्राधान्य दिले होते. परंतु त्याचे अत्यल्प प्रमाण होते. बहुतांश मतदान केंद्रवर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी 9 पर्यंत केवळ 3.68 टक्के मतदान झाले. त्यामध्ये उच्चभ्रु सोसायटया, बंगले परिसरातील नागरीकांची संख्या लक्षणीय होती. 

सकाळी व्यायामला, बागेत फिरयायला आलेल्या नागरिकांनी थेत मतदान करण्यास प्राधान्य दिले. 9 वाजल्यानंतर मात्र मतदान केंद्र मतदाराच्या गर्दीने फुलू लागले. 

मतदान केंद्रबाहर असलेल्या राजकीय पक्षाच्या स्टॉलवर नागरीकांनी आपले मतदान बूथ शोधायला गर्दी केली होती. त्यानंतर हळूहळू गर्दी वाढत गेली, त्यामध्ये तरुण, महिला व तरुणीचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत या मतदारसंघमध्ये सकाळच्या तुलनेत तिप्पट म्हणजे 11.72 टक्के इतके मतदान झाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadgaon Sheri constituency three times more voting as compared to the morning