नोकरीची शाश्वती नसल्याने अभियंत्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

विमाननगरमधील घटना; हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून मारली उडी
वडगाव शेरी - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगला पगार असूनही कायम नोकरीची शाश्वती नसल्याच्या दडपणाखाली येऊन
संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना विमाननगर येथे घडली.

विमाननगरमधील घटना; हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून मारली उडी
वडगाव शेरी - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चांगला पगार असूनही कायम नोकरीची शाश्वती नसल्याच्या दडपणाखाली येऊन
संगणक अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना विमाननगर येथे घडली.

गौडा गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद (रा. आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
सहायक पोलिस निरीक्षक दिलीप जयसिंगकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीकृष्ण हा तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील विमाननगर येथील "टिटनी बाऊस' या आयटी कंपनीत नोकरीसाठी दाखल झाला होता. या कंपनीत निवड होताना पूर्वीच्या कंपनीपेक्षा त्याला 33 टक्के जादा पगार मिळणार होता. त्याला सुमारे साडेआठ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते.

तो पुण्यात नवा असल्याने कंपनीने त्याची पंधरा दिवसांसाठी विमाननगर येथील फॉर्चुन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. बुधवारी तो हॉटेलमधील रुममध्ये परतला. मध्यरात्री त्याने चाकूने उजव्या हातावरील नस कापली. त्यातून मोठा रक्तस्राव झाला. नंतर तो राहात असलेल्या चौथ्या मजल्यावरील खोलीतून बाहेर आला आणि जीना चढून पाचव्या मजल्यावरील टेरेसवर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. त्याच्या या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. आयटी क्षेत्रात कायम नोकरीची शाश्वती नसल्याने व त्यामुळे कुटुंबाची काळजी वाटत असल्याने मी आत्महत्या करीत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत लिहिले होते.

Web Title: vadgav sheri pune news engineer suicide