esakal | वनसेवा मुख्य परीक्षेत वैभव दिघे राज्यात प्रथम
sakal

बोलून बातमी शोधा

वैभव दिघे

वनसेवा मुख्य परीक्षेत वैभव दिघे राज्यात प्रथम

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.सी.) घेण्यात आलेल्या वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेत १० वी पर्यंत शिक्षण घेतलेला व मूळ गाव म्हसे खुर्द(ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील वैभव सुरेश दिघे हा राज्यातून व मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल व वनविभागातील सहायक वन संरक्षक गट अ तशेच वन क्षेत्रपाल गट ब या संवर्गातील एकूण १०० पदावरील भरतीकरिता १५ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा- २०१९ चा अंतिम निकाल २९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. या परीक्षेत वैभव सुरेश दिघे याने उत्तुंग यश मिळविले आहे.

हेही वाचा: अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर

एका गरीब मेंढपाळ कुटूंबात हलाखीचे जीवन जगणाऱ्या वैभवने जिद्द, चिकाटी व अभ्यासूवृत्तीने हे यश मिळवून उंच भरारी घेतली आहे.वैभव हा मूळचे तळेगाव ढमढेरे येथील व सध्या यवतमाळ येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असलेले खंडेराव धरणे यांचा भाचा असून वैभवचे १० वी पर्यंतचे शिक्षण तळेगाव ढमढेरे येथे तर १२ वीचे शिक्षण शिरूर विद्याधाम प्रशालेत झाले आहे. कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये डिग्री आणि राहुरी कृषि विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.

मामा खंडेराव धरणे यांची प्रेरणा, गुरुजनांची शिकवण व आई- वडिलांचे आशिर्वाद यामुळे हे यश मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया वैभवने सकाळ शी बोलताना व्यक्त केली. वैभवच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top