वैशाली नागवडे म्हणतात, रमेश थोरात यांना संधी मिळाली तर...

vaishali nagavade
vaishali nagavade
Updated on

दौंड (पुणे) : पक्षनिष्ठ, महिला आणि ग्रामीण चेहरा म्हणून पक्षाकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल, पण दौंड तालुक्याला संधी मिळायला हवी, अशी इच्छा पुणे जिल्हा राष्ट्रवादी माहिला कांग्रेसच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी आवश्यक असलेल्या सहकार व स्वयंसेवी संस्थेचा अनुभव या निकषात बसत असल्याने पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे वैशाली नागवडे यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सदैव पक्षनिष्ठ म्हणून त्या काम करीत आहेत. काम करताना असताना त्यांच्यावर कोणत्याही गटाचा शिक्का नसून पक्ष पदाधिकारी म्हणून त्या परिचित आहेत.

वैशाली नागवडे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून, त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका म्हणून काम पाहिले आहे. त्या सन २००७ ते २०१२ या कालावधीत दौंड पंचायत समिती सदस्या होत्या. त्यांनी सन २००९ मध्ये राज्य सरकारच्या पंचायत राज समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्या सन २००५ ते २०१६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालिका होत्या, तर त्यांनी सन २०१३ ते २०१६ या कालावधीत महानंदचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांची त्यांनी सन २०१३ मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी) संचालिका म्हणून नियुक्ती झाली होती. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील बरेली स्थित इंडियन वेटरिनरी रिसर्च इंस्टिट्यूटच्या संचालिका म्हणून काम पाहिले आहे. 

नागवडे यांनी शरद मल्हार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा या नात्याने मागील १५ वर्षापासून पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी समूह लोकनृत्य व समूह गीत स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. या महोत्सवात जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांमधील महिलांचे संघटन करण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. त्याचबरोबर प्रतिभा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे.

दौंड तालुक्यातून माजी आमदार रमेश थोरात हे इच्छूक असताना उमेदवारी संबंधी विचारले असता वैशाली नागवडे म्हणाल्या की, पक्षनिष्ठ, महिला आणि ग्रामीण चेहरा म्हणून पक्षाकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली आहे. रमेश थोरात यांना उमेदवारी मिळाली, तरी माझी हरकत नाही. दौंड तालुक्याला संधी मिळायला हवी. ``

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com