
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे शहरातील स्वारगेट परिसरातून अटक केली. वैष्णवीच्या मृत्यूला ८ दिवस उलटल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती दोन फरार आरोपी लागले. जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून "आम्ही तपास करतोय, शोध घेतोय, आरोपी पर्यंत लवकर पोहचू" हेच पोलीस सांगत होते. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे हा पुणे शहरातच होता. तरी पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.