
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी न्यायालयाने हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ केली. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुषिंग यांनी धक्कादायक असे दावे केले. वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसात त्याचा साखरपुडा होणार होता. तिच्या आत्महत्येमुळे तो थांबला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचं आणि वैष्णवीच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा म्हणून आम्ही डिटेल्स न्यायालयात दिले असल्याचं वकिलांनी सांगितलं.