
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांनी केलीय. मात्र पोलीस कोठडीला विरोध करताना हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला आहे. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची आणि ती सुसाइडल टेन्डन्सीची होती असाही दावा हगवणेंच्या वकिलांनी केलाय. वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. तर सासरे आणि दीराला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.