
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाव आलेला आणि सध्या फरार असलेला तिच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाण याच्या घरावर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. त्याच्या लॅपटॉपसह इतर काही गोष्टी पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून त्याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.