
Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी महिला आयोगानं नेमकं काय केलं? याच उत्तर आज आयागोच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलं. विष्णवीचे आई-वडील अर्थात कसपटे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी वैष्णवीबाबत आमच्याकडं कुठलीही तक्रार आली नव्हती, तर महिला आयोगानं स्वतःहून या प्रकरणी तक्रार दाखल केली, असं स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याप्रकरणात आयोगानं केलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली.