
Vaishnavi Hagvane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. वैष्णवीचं ९ महिन्यांचं बाळ आता तिच्या आई-वडिलांकडं म्हणजेच कसपटे कुटुंबाच्या ताब्यात मिळालं आहे. पण हे बाळ तीन-चार जणांच्या हातून कसपटे कुटुंबाकडं आलं आहे. सुरुवातीला ते निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडं होतं.
पण या प्रकरणाची दखल राज्य शासनानं घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या. पण यामध्ये निलेश चव्हाण हा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. याबाबत हगवणे कुटुंबाच्या मोठ्या सुनेनं अर्थात मुयरी जगपात-हगवणे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप करताना निलेश चव्हाण याच्याबाबत खुलासा केला आहे.