व्हॅलेंटाईन डे 2019 : ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पुणे - व्हॅलेंटाइन डे म्हणजे भेटवस्तू, ग्रीटिंग्स, फुले हे ओघाने आलेच. किंबहुना, गेल्या काही वर्षांमध्ये भारतातही ती एक परंपरा झाली आहे. दरवर्षी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू येत असतात. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये साधारण १५ ते २० दिवस आधीच ग्राहकांची रेलचेल असते. या वर्षीही भेटवस्तू, ग्रीटिंग खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. मात्र सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन भेटवस्तू खरेदीवर जास्त भर दिसून येत आहे. 

अनेक संकेतस्थळांवर भेटवस्तू खरेदीचा ओघ सुरू आहे. व्हॅलेंटाइन वीकसाठी ऑफरही चालू आहेत. ‘कस्टमाईज गिफ्टकार्ड’लाही ऑनलाइन मोठी मागणी आहे. आवडत्या रंगामध्ये, डिझाइनमध्ये हवे तसे गिफ्टकार्डस बनवून घेता येणे ग्राहकांना सोयीचे वाटते. भेटवस्तू देण्यापेक्षा ऑनलाइन व्हाउचरलाही पसंती आहे. भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये मोठ्या टेडीबिअरपेक्षा छोट्या टेडीबिअरच्या किचन बघायला मिळत आहेत. छोटे शो-पीस, जोडीदाराच्या फोटोसह असलेली घड्याळे, फोटो कोलाज करून लावता येण्यासाठी वेगवेगळ्या फोटोफ्रेम अशा अनेक गोष्टी दिसत आहेत.

व्हॅलेंटाइन डेसाठी भेटवस्तूंची अजूनही मोठी मागणी आहे. कॉलेज तरुण-तरुणी यासाठी महिनाभर आधी तयारीला लागतात. तर मध्यमवयीन वर्गही यासाठी मागे नाही. दर वर्षी एक तरी वस्तू बाजारात नवीन येते. ७० ते ८० रुपयांपासून ते ४ ते ५ हजारांपर्यंतच्या वस्तू किंवा ग्रीटिंग्स ग्राहक खरेदी करतात.
- रूपाराम चौधरी, विक्रेते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day 2019 Online Purchasing Increase