Valentine Day : ‘व्हॅलेंटाइन डे’चे हॅशटॅश सेलिब्रेशन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

‘टू माय व्हॅलेंटाइन...हॅप्पी व्हॅलेंटाइन डे, ’असे म्हणत प्रेमी युगुलांनी एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने दुकान, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली होती. प्रियजणांना भेटवस्तू घेण्यासाठी सकाळपासूनच अनेकांची लगबग सुरू होती.

पिंपरी - ‘टू माय व्हॅलेंटाइन...हॅप्पी व्हॅलेंटाइन डे, ’असे म्हणत प्रेमी युगुलांनी एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने दुकान, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली होती. प्रियजणांना भेटवस्तू घेण्यासाठी सकाळपासूनच अनेकांची लगबग सुरू होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बदलत्या काळात प्रेम व्यक्त करण्याची पद्धती बदलल्या आहेत. ‘हॅशटॅग’च्या युगात भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ हा हक्काचा दिवस झालाय. आता ‘व्हॅलेंटाइन डे’ हे एका दिवसाचे सेलिब्रिशन राहिले नसून, तर आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास सेलिब्रिशन करण्यात येते. या सेलिब्रिशनमध्ये पहिल्याच दिवशी ‘रोझ डे’ असतो. या ‘व्हॅलेंटाइन’ वीकमध्ये शुभेच्छा संदेश, चॉकलेट, फुले, अशा विविध आकर्षक, आवडत्या वस्तू जवळच्या व्यक्तीला देऊन प्रेम व्यक्त करण्याचा नवा ‘ट्रेंड’ रुजला आहे. 

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईच्या काय आहेत प्रतिक्रिया

‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने तरुणाई प्रेमाच्या रंगात रंगली होती. महाविद्यालयातही नेहमी असणारी विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र होते. संभाजीनगर येथील नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवस ‘लायब्ररी डे’ म्हणून साजरा केला. महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही केल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली. गझलकार प्रदीप निफाडकर यांनी विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’ साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day hashtag celebration