‘वल्लभनगर’चे मॉडर्ननायझेशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पिंपरी - वल्लभनगर एसटी बस स्थानकाचे स्वारगेटप्रमाणे ‘मॉडर्ननायझेशन’ करण्याची सूचना महापालिकेने मेट्रोला केली आहे. महापालिका प्रशासन आणि मेट्रो यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

पिंपरी - वल्लभनगर एसटी बस स्थानकाचे स्वारगेटप्रमाणे ‘मॉडर्ननायझेशन’ करण्याची सूचना महापालिकेने मेट्रोला केली आहे. महापालिका प्रशासन आणि मेट्रो यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

त्या ठिकाणी मॉडर्न पद्धतीचे स्थानक हवे. प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या हॉटेल, बॅंक, एटीएम अशा सुविधा हव्या. प्रवाशांच्या सोयीसाठी त्याअंतर्गत पीएमपी, रिक्षा, मेट्रो थांबे हवे, वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असावी, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. बसचालक आणि वाहकांसाठी उत्तम प्रकारचा विश्रांती कक्षही बांधता येईल. बसस्थानकाचे आधुनिकीकरण करताना त्याठिकाणी १२ ते १५ मजली इमारत उभारल्यास त्यातून मेट्रोला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते, असेही महापालिकेने म्हटले आहे.

११ एकर बस स्थानकाची जागा
३ एकर महामेट्रोला दिलेली जागा
२ विश्रांती कक्ष

सद्यःस्थिती
वल्लभनगर बसस्थानकाचा वापर सध्या फक्‍त एसटी बसेससाठी करण्यात येत आहे. या ठिकाणी बसच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र डेपो कार्यरत आहे. बसस्थानकावरून राज्यातल्या विविध शहरांसाठी बस सुटतात. एसटी महामंडळाने या स्थानकाच्या आधुनिकीकरण करण्याचा विचार आतापर्यंत केलेला नाही. बस स्थानकाच्या बाहेरून मेट्रो जाणार असल्यामुळे महामेट्रोला या स्थानकाचा कायापालट करून ते अत्याधुनिक करणे शक्‍य आहे.

स्थानकाचे आधुनिकीकरण झाल्यानंतर प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणे शक्‍य होणार आहे. नाशिक फाटा परिसरात रेल्वे स्थानक आहे. मेट्रोदेखील येथून जाणार आहे. पीएमपी आणि रिक्षाची वाहतूक इथून नियमितपणे होत असते. त्यामुळे हा भाग ‘मल्टिमोडल हब’ म्हणून विकसित होणे शक्‍य आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये ‘हब’चा समावेश करण्यात आला आहे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्‍त

Web Title: vallabhnagar depo Modernization