

Varandha Ghat Landslide
Esakal
भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसाळण्याचे सत्र काही केल्या थांबेना. शुक्रवारी व रविवारी पडलेल्या दरडींनंतर पुन्हा रविवारी (ता. ५) रात्री भोर हद्दीतील वारवंड ते उंबर्डे दरम्यानच्या रस्त्यावर चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी रात्री दरडी कोसळल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पुणे जिल्ह्यातून महाड कडे जाणाऱ्या वरंध घाटात दोन्ही बाजूस दरड कोसळल्यामुळे 27 गाड्यांमधील 70 ते 80 रविवारी रात्रीपासून अडकून पडले आहेत.