esakal | Video : वरसगाव धरण फुल्ल! 100 टक्के पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

Varasgaon dam is 100 percent full

- खडकवासला प्रकल्पात 28.62 टीएमसी पाणीसाठा
- उजनी धरणही 85 टक्के भरले

Video : वरसगाव धरण फुल्ल! 100 टक्के पाणीसाठा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरण साखळीतील सर्वाधिक 12.82 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेले वरसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी मुठा नदीपात्रात पाच हजार 136 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. तर, उजनी धरणात सुमारे 46 टीएमसी (85 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

पुणे विभागाला पूर्णवेळ उपसंचालक द्या; कुणी केली मागणी?​

खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि खडकवासला ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यापाठोपाठ आता वरसगाव धरणही 100 टक्के भरले आहे. टेमघर धरण 86 टक्के भरले आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असून, त्यानंतर सांडव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. पानशेत धरणातून एक हजार 980 क्‍युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

1947मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? वाचा 74 वर्षांत बदललेला भारत

भीमा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, मुळशी, वीर, कळमोडी, आंद्रा, नाझरे आणि गुंजवणी ही धरणे पूर्ण भरली आहेत. डिंभे, चासकमान, कासारसाई ही धरणे जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत. तर पिंपळगांव, माणिकडोह आणि विसापूर या धरणात अजूनही केवळ 30 ते 35 टक्‍क्‍यांच्या जवळपास पाणीसाठा आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 28.62 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 98.15 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 28.93 टीएमसी (99.26 टक्के) पाणीसाठा होता. गेल्या 12 तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 45 मिलिमीटर, वरसगाव 14, पानशेत 15 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 

टेमघर 3.19   (85.91)
वरसगाव 12.82   (100)
पानशेत 10.65     (100)
खडकवासला 1.96  (99.16)


इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड 6.37     (83.13)
पवना 7.69     (90.39)
मुळशी 18.46   (100)
भाटघर 23.50     (100)
नीरा देवघर 11.73    (100)
वीर 9.41    (100)
उजनी 45.46    (84.85)

 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top