esakal | 'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी!
sakal

बोलून बातमी शोधा

Khel_Ratna_2020

या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा कोविड-१९ मुळे ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.

'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

National Sports Award 2020 : नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज क्रिकेटर रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅरा ऍथलीट मारियाप्पन थांगावेलु यांना यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर झाला आहे. निवड समितीच्या केलेली शिफारशीनंतर क्रीडा मंत्रालयाने या खेळाडूंना पुरस्कार देण्यास मान्यता दिली आहे. तसेच अर्जुन पुरस्कारासाठीही २९ खेळाडूंची निवड झाली आहे. या सर्वांची निवड क्रीडा मंत्रालयाच्या १२ सदस्य निवड समितीने ही शिफारस केली आहे.

IPL 2020 चे टायटल स्पॉन्सर आता Dream 11; टाटा, बायजूला मागे टाकून मारली बाजी​

रोहितची  उत्कृष्ट फलंदाजीमुळे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर विनेश फोगटची २०१८ मधील राष्ट्रकुल खेळात आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक तसेच २०१९ मधील आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते, यामुळेच विनेशला या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. विनेशला पुरस्कार जाहीर झाल्यावर तिने हा तिच्या कारकीर्दीतील सर्वात महत्वाचा क्षण आहे असं सांगितलं आहे. तसेच यानंतर मी देशासाठी अजून पदके जिंकेन, असा विश्वासही विनेशने व्यक्त केला.

तो शांत... बाकीचे खल्लास​

रोहित शर्मा खेलरत्न पुरस्कार मिळवणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, नुकताच निवृत्त झालेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांना हा सन्मान मिळाला आहे. १९९८ मध्ये खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारा सचिन पहिला भारतीय क्रिकेटपटू होता. धोनीला २००७ मध्ये आणि विराट कोहलीला २०१७ मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत हा पुरस्कार मिळाला होता. या निवड समितीत माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग यांचा समावेश आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणची (साई) बैठक झाल्यानंतर ही नावे निश्चित करण्यात आली.

'माही जैसा कोई नहीं!'

क्रीडादिनी हे पुरस्कार देण्यात येतील : 

या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा कोविड-१९ मुळे ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, त्यांना आपापल्या भागांमधून लॉग इन करून २९ ऑगस्टच्या कार्यक्रमात सहभागी होता येईल. हा पुरस्कार प्रदान सोहळा नेहमी राष्ट्रपती भवनात होतो. २९ ऑगस्टला हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो आणि हा दिवस देशात 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)