
Vasant More son political launch
ESakal
महापालिका निवडणुका येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पार पडण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर नेते मंडळींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेतील डॅशिंग लोकप्रतिनिधी अशी ओळख मिळवलेले माजी नगरसेवक वसंत मोरेही तयारीला लागले आहेत. मात्र त्यासोबतच त्यांनी आपल्या लेकाचंही पॉलिटिकल लाँचिंग सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत मुलाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत वसंत मोरेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मोठे संकेत दिले आहेत.