
गेली दोन वर्षापासून या पुतळा परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशी जुनी सांगवीकरांची मागणी होती. याचे पालिका स्थापत्य विभागाकडून गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले होते.
जुनी सांगवी (पुणे) : गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणामुळे जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या पद्मविभुषण वसंत दादा पाटील पुतळा परिसराचे अंतिम टप्प्यात काम प्रगतिपथावर असून या चौकातील सुशोभिकणामुळे जुनी सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
- लग्न की करिअर ? मुलींपुढे पडला प्रश्न
गेली दोन वर्षापासून या पुतळा परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशी जुनी सांगवीकरांची मागणी होती. याचे पालिका स्थापत्य विभागाकडून गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, पुन्हा लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने हा पुतळा परिसर झाकण्यात आला होता. याचे पुन्हा काम सुरू करण्यात येऊन ते सध्या अंतिम टप्प्यात प्रगतीपथावर आहे. येथे जुने बांधकाम काढून नवीन ग्रेनाईट मार्बल भिंती आणि सुशोभिकरण करण्यात आल्याने दापोडी सांगवीला जोडणाऱ्या पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ हा पुतळा चौक गेली अनेक वर्षापासून जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार अशी ओळख सांगत उभा आहे. सुशोभिरणामुळे येथील सौंदर्यात भर पडली आहे.
- मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला भटनागर पुरस्कार जाहीर!
येथे पीएमपीएलचा सांगवीकरांचा मुख्य थांबा आहे. एरव्ही येथून पुणे आणि नगरमध्ये जवळपास पन्नास गाड्यांच्या बस फेऱ्या होतात. नागरीकांची मागणी आणि येथील दुरवस्थेच्या प्रश्नाचा पाठपुरावा सकाळमाध्यमातून वेळोवेळी करण्यात आला होता. तर हा पुतळा २३ मे १९८५ रोजी सांगवी पुतळा समितीच्या वतीने महापालिकेस भेट देण्यात आला होता. याचे तत्कालीन विधानपरिषद अध्यक्ष जयवंतराव टिळक, दुग्धविकासमंत्री अनंतराव थोपटे, लक्ष्मणशास्त्री जोशी, अशोक मोहोळ आदींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर सद्यस्थितीत या पुतळ्याचे नव्याने अठरा लाख रूपये खर्च करून येथे ग्रेनाईट, छत, विद्युतीकरण असे सुशोभिकरण करण्यात आल्याने सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)