आजपासून सुरांचा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे - शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि संगीत नाटकाची एकत्रित मेजवानी असणारा यंदाचा ‘वसंतोत्सव’ आजपासून (ता. १८) कर्वेनगर येथील पंडित फार्मस्‌च्या मैदानात रंगणार आहे. दिग्गज कलावंतांची हजेरी आणि कार्यक्रमातील वैविध्य हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

पुणे - शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि संगीत नाटकाची एकत्रित मेजवानी असणारा यंदाचा ‘वसंतोत्सव’ आजपासून (ता. १८) कर्वेनगर येथील पंडित फार्मस्‌च्या मैदानात रंगणार आहे. दिग्गज कलावंतांची हजेरी आणि कार्यक्रमातील वैविध्य हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक पंडित डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव होतो. यंदा हा महोत्सव पंडित फार्मस्‌ येथे होत आहे. १८ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची सुरवात दुपारी चारला पं. उस्ताद मोइनुद्दीन खाँ आणि मोमीन खाँ यांच्या सारंगीवादनाने होत आहे. त्यानंतर शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. या दिवसाची सांगता प्रसिद्ध गायिका बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे. 

‘सकाळ’च्यावतीने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे पी. एन. गाडगीळ अँड सन्स हे मुख्य प्रायोजक असून, रावेतकर हाउसिंग हे पॉवर्ड बाय प्रायोजक, तर लोकमान्य मल्टिपल को-ऑपरेटिव्ह सोसायटी सहप्रायोजक आहेत. 

वसंतोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. वसंतोत्सवामध्ये येणाऱ्या प्रत्येक रसिकाच्या मनात जसे कर्णप्रिय संगीत वर्षभर घोळत राहते, तसेच ‘सुमधुर’ची चव त्यांच्या जिभेवर कायम घोळत राहील, याची आम्हाला खात्री वाटते. लागली वसंतऋतूची चाहूल, त्यात संगीताचा गोडवा, त्यामुळे रसिकजन तृप्त होतील, चाखून सुमधुरचा गोडवा 
- रमण सोनी, व्यवस्थापकीय संचालक, सुमधुर

महोत्सवात उद्या (शनिवारी) 
  कमलेश भडकमकर 
यांचे ‘सप्त शतक’
  विक्कू विनायक्रम 
यांचे ‘थ्रीजी’ सादरीकरण 
  राहुल देशपांडे 
यांचे शास्त्रीय गायन 

प्रवेशिका नसलेल्यांसाठी खास भारतीय बैठक
या कार्यक्रमाच्या तीनही दिवसांच्या प्रवेशिका संपल्या आहेत. मात्र, रसिकांच्या आग्रहास्तव कार्यक्रमस्थळी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशिका नसणाऱ्यांनाही या कार्यक्रमास उपस्थित राहता येणार आहे. त्यासाठी स्क्रीनही लावण्यात येणार आहेत.

Web Title: Vasantotsav from today at the Pundit Farms grounds of Karvenagar