वसुंधरा महोत्सवास उद्यापासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे : 'किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार असून ‘प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा यावर्षीच्या महोत्सावाचा विषय आहे.  उदया गुरवारी (ता.3) सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे महोत्सवाला सुरवात होईल. महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक शेखर दत्तात्रयी(चेन्नई) यांच्या हस्ते होणार आहे.

यंदा महोत्सवात जवळपास 75 उपक्रम राबिवले जाणार असून महोत्सवासाठी 25 हजार पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. या महोत्सवात 50 संस्था आणि 42 कॉलेज सहभागी होणार आहे. महोत्सवाच्या प्रवेशिका मोफत मिळत असून सर्वांसाठी खुला आहे.  

दरम्यान महोत्सवात दोन महत्त्वाचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. वॉटर एक्स्पर्ट म्हणून ओळख प्राध्यापक विजय परांजपे यांना जीवन गौरव सन्मान देण्यात येईल. पाणी संस्कृतीचा अभ्यास तसेच शासनाचे पाणी विषयावरील प्रकल्पांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. शून्य कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणारे  मल्टी जी. पी. एस. डब्ल्यू. एम. युनिट(जनार्दन हुलगी आणि सहकारी सत्यनारायण)ला वसुंधरा मित्र सन्मान देण्यात येईल. विघटन न होणार कचऱ्यापासून वापरयुक्त विटांची निर्मिती यांनी केली आहे, 

Web Title: Vasundhara Festival starts from tomorrow