राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्याप्रतिष्ठानची वसुंधरा वाहिनी व्दितीय

राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्याप्रतिष्ठानची वसुंधरा वाहिनी व्दितीय

बारामती : 'युनिसेफ' आणि 'सेंटर फोर सोशल बिहेविअर चेंज कम्युनिकेशन', यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय स्पर्धेमध्ये विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीचा राज्यात द्वितीय क्रमांक आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविड 19 च्या काळातील जीवन आणि रेडिओची भूमिका या विषयी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी वसुंधरा वाहिनीवरून मातृ आणि बालआरोग्य, घरगुती हिंसा आणि गैरवर्तन, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोषण आणि आहार, कोरोनाग्र्स्त रुग्णाची अपराधी भावना आणि भेदभाव, महामारीच्या काळातील शिक्षण असे विविध विषयावर कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत जनसंपर्क वाढवण्यासाठी वसुंधरा वाहिनीने ‘यु टर्न 20 ’ या स्पर्धांचे आयोजन केले होते. 

युनिसेफच्या सहकार्याने अशा स्वरूपाचा कार्यक्रम महाराष्ट्रामधील सर्व सामुदायिक रेडिओसोबत  प्रथमच राबविण्यात आल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख आशा मोरे यांनी सांगितले.   

आय. ई. सी. ब्युरोचे उपसंचालक डॉ. कैलाश बाविस्कर, प्रेस ब्युरोचे उपसंचालक डॉ. राहुल तिडके,  महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ज्ञानोबा इगवे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. 

कोरोना काळात वसुंधरा वाहिनी प्रभावी जनसंपर्क आणि जनजागृती करून दर्जेदार कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून प्रसारित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी सांगितले. उपाध्यक्ष अँड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची,  रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांनी उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. 

कल्पना नागठाणे व अनिल गुरूवड्डयार यांनी तंत्रसहाय्य केले. वसुंधरा वाहिनीच्या निवेदिका स्नेहल कदम व ऋतुजा आगम यांनी परिश्रम घेतले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com