
मकर संक्रांतीचे वेध लागले असून, त्याच्या एक दिवस अगोदर भोगीचा सण (ता. १३) साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भाज्यांचा, धान्यांचा आस्वाद घेण्याची पद्धत आहे. येत्या बुधवारी भोगी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या पापडी, वांगी, मटार, भुईमूग शेंग, हरभरा, वालवर, पावटा, गाजर, या भाज्यांची मार्केट यार्डातील किरकोळ बाजारासह महात्मा फुले मंडईत आवक आणि मागणीही वाढली आहे.
मार्केट यार्ड - मकर संक्रांतीचे वेध लागले असून, त्याच्या एक दिवस अगोदर भोगीचा सण (ता. १३) साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भाज्यांचा, धान्यांचा आस्वाद घेण्याची पद्धत आहे. येत्या बुधवारी भोगी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या पापडी, वांगी, मटार, भुईमूग शेंग, हरभरा, वालवर, पावटा, गाजर, या भाज्यांची मार्केट यार्डातील किरकोळ बाजारासह महात्मा फुले मंडईत आवक आणि मागणीही वाढली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मार्केट यार्डासह शहराच्या विविध भागातील मंडईमध्ये भोगीसाठी लागणाऱ्या हरभरा, वाटाणा, पापडी, वालवर, पावटा, वांगी, मटार, भुईमूग शेंग, कांद्याची पात, गाजर, गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, मेथी यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
यू आर सस्पेन्डेड; पुण्यात बिल्डरच्या खुन्यासोबतच हवालदारानं केली बैठक
संक्रांतीसाठी गूळ, तीळ, बाजरीचे तयार पीठ आदी वस्तूंनाही मोठी मागणी झाली आहे. सुवासिनी सुगडामध्ये हंगामातील भाज्या, धान्य घालून पूजन करतात. सोमवारी आणि मंगळवारी भोगीच्या भाज्यांना मागणी राहील, असे श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil