अवकाळी पावसामुळे मांजरी उपबाजारात तरकारीचे भाव कोसळले

अवकाळी पावसामुळे (शुक्रवार, दि. ११ मार्च) मांजरी उपबाजारात शनिवारी (दि. १२) तरकारीचे बाजारभाव कोसळले.
Majari Vegetable Market
Majari Vegetable MarketSakal
Summary

अवकाळी पावसामुळे (शुक्रवार, दि. ११ मार्च) मांजरी उपबाजारात शनिवारी (दि. १२) तरकारीचे बाजारभाव कोसळले.

उंड्री - अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) (शुक्रवार, दि. ११ मार्च) मांजरी उपबाजारात (Manjari Market) शनिवारी (दि. १२) तरकारीचे बाजारभाव (Market Rate) कोसळले. भाजीपाला शिल्लक राहिल्याने शनिवारी (दि. १२ मार्च) मांजरी उपबाजारात भाजीपाला (Vegetable) खरेदीदार व्यापारी आले नाहीत. काढणीस आलेल्या तरकारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उन्हाळ्यामुळे उष्ण आणि थंड हवामानामुळे मेथी आणि कोथिंबीरीची आवक काही प्रमाणात घटली आहे. सरासरीपेक्षा बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती मांजरी उपबाजारप्रमुख विजय घुले यांनी सांगितले.

घुले म्हणाले की, तसेच, हडपसर उड्डाण पुल बंद असल्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्याचा परिणाम तरकारीच्या बाजारभावावर झाला आहे. शुक्रवारी (दि. ११ मार्च) सायंकाळी पाच-सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मांजरी उपबाजारातून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भाजीपाला घेऊन जाण्यास उशीर झाल्याने विक्री करता आली नाही. त्यामुळे भाजीपाला शिल्लक राहिल्याने शनिवारी (दि. १२) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील खरेदीदार मांजरी उपबाजारामध्ये खरेदीसाठी आले नाहीत.

हडपसरमधील उड्डाण वाहतुकीसाठी बंद आणि वाहतूककोंडीच्या त्रासामुळे व्यापारी आणि नागरिकही त्रासले आहेत. त्यामुळे मांजरी उपबाजारमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतमालाच्या बाजार भावावरही मोठा परिणाम झाला आहे. हडपसरमध्ये उड्डाण पुलादरम्यान वाहनांची रस्त्यावर खच्चून गर्दी असल्यामुळे हडपसर भाजी मार्केटमध्येही खरेदीदारांची संख्या घटली आहे, असे व्यापारी नीलेश दर्शले, बापू मोडक, शिवाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले.

Majari Vegetable Market
सूस - महाळुंगेसाठी निधी कमी पडून देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकरी शरद गायकवाड, संतोष कुंजीर, रेखा खेडेकर, दत्ता दिघे, गणेश डोंबे म्हणाले मांजरी उपबाजारमध्ये शनिवारी (दि. १२) तरकारीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मात्र, शुक्रवारी शिल्लक राहिलेला भाजीपाला आणि हडपसर उड्डाण पुल बंद असल्यामुळे तरकारीला अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या तरकारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शनिवारी (दि. १२ मार्च २०२२) झालेली तरकारी आवक क्विंटलमध्ये - भेंडी-६५, गवार-१०, टोमॅटो-३८३, वाटाणा-२, घेवडा-६, दोडका-३५, मिरची-३०, दुधीभोपळा-४२, काकडी-९०, कारले-१२, फ्लॉवर-४०७, कोबी-९९, वांगी-१२५, द्राक्षे-४, कांदा-१५३, पावटा-२, वालवर-७, गोसाले-७ लिंबू-१०, शेवगा-३, कलिंगड-४.

पालेभाज्या (शेकड्यामध्ये) - कोथिंबीर-३७,२००, मेथी-३६,६५०, शेपू-७,०००, कांदा-१२,०००, मुळा-१६००, चाकवत-५००, करडई-८,०००, चवळई-२०५०, अंबाडी-५५०, चुका-७००, पालक-२५,६००, कडिपत्ता-३५००, पुदिना-३८००, बिट-६७०, नवलकोल-१३०, आळू-१०७०, मोहरी-७००, हरभरा गड्डी-१,०००.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com